Home नगर जिल्हा अहिल्यानगर महिलांनी पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर महिलांनी पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

महिलांनी पिंक ई-रिक्षा योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अहमदनगर दि. १६ – गरजू महिलां व मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

योजने अंतर्गत महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि चालविण्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी या योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्लॉट क्र.४/५/३, जिव्हाळा हाऊस, खोडदे यांची इमारत, वंदे मातरम कॉलनी, कल्याण रोड, अहिल्यानगर येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.