अहमदनगर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील संतोष जाधव या कर्मचाऱ्याला अहमदनगरच्या लाच लुचपत विभागाने बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे अशी माहिती समोर येत असून एका गावातील सभा मंडपाचे काम झाल्यानंतर बिल काढण्यासाठी ही लाच मागितली असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.आज बांधकाम विभागात लाच घेताना एकाला पकडल्याने खळबळ उडाली आहे.
*लाचेचे कारण* -.तक्रारदार ह्या सन २०२१ पासून जांभळी गावच्या सरपंच आहेत. त्यांचे गावासाठी सभा मंडपाकरिता आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सदर कामास नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांनी प्रशासकीय मान्यता देऊन सदर कामाची वर्क ऑर्डर देण्या करिता कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्याकडे सादर केलेले असून अद्याप वर्क ऑर्डर मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर येथील लिपिक जाधव यांनी सभा मंडपाचे कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेच्या दीड टक्के रक्कम २३,०००/- रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी प्राप्त झाली होती, त्यानुसार आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर येथे लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक संतोष बाळासाहेब जाधव यांनी तक्रारदार यांचे सोबत त्यांचे पती असताना तक्रारदार यांचे पतीकडे जांभळी गावासाठी मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या कामाची वर्क ऑर्डर देणे करिता पंचासमक्ष २३०००/- रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती २२,५००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार आज दिनांक ०१/१२/२०२३ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, अहमदनगर येथे सापळा आयोजित केला असता यातील आरोपी लोकसेवक जाधव यांनी तक्रारदार यांचे पतीकडून पंचासमक्ष २२५००/- रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
अहमदनगर ब्रेकिंग जिल्हा परिषदेचा कनिष्ठ लिपिक ‘एसीबीच्या’ जाळ्यात
- Advertisement -