Saturday, December 9, 2023

अहमदनगर व्यावसायिकाचा खून, घरातून सात लाख लुटले, पत्नी गंभीर जखमी

अहमदनगर – तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी व्यावसायिक नईम रशीद पठाण यांचा खून केला. त्यांनी घरातून सात लाख रुपये लुटून नेले. चोरांच्या मारहाणीत पठाण यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार नईम पठाण यांनी जागेच्या व्यवहारासाठी तसात लाख रुपये घरी आणले होते. कुणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवली असावी. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास नईम यांच्या पत्नी बुशरा यांनी घराबाहेरील बाथरूमकडे जाण्यासाठी दरवाजा उघडताच दबा धरून बसलेले चोर आत आले. त्यांनी नईम व त्यांची पत्नी बुशरा यांना त्यांनी जबर मारहाण केली.

चोरांनी घरातील ओढणीने नईमच्या गळ्याला बांधून फास आवळला. त्यात नईमचा मृत्यू झाला व घरातील सात लाख रुपये घेऊन चोरांनी पळ काढला. पोलिस तपास करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d