Wednesday, April 17, 2024

अहमदनगर जामखेड गोळीबार प्रकरण,सराईत गुन्हेगार चिंग्या साथीदाराहस जेरबंद

जामखेड गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार चिंग्या साथीदाराहस जेरबंद,
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 03/03/24 रोजी फिर्यादी श्री. आबेद बाबुलाल पठाण वय 40, रा. भवरवाडी, ता. जामखेड हे लेबर मुकादम असुन त्यांचेकडील मजुर लक्ष्मण कल्याण काळे रा. जामखेड यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दिड वर्षापुर्वी मारहाण केल्याने त्याचे विरुध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याचे साथीदारासह येवून फिर्यादीस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीचे उजव्या पायाचे पोटरीला दुखापत केली याबाबत जामखेड पो.स्टे.गु.र.नं. 101/2024 भादविक 307, 504, 34 सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे खुनाचा प्रयत्न अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना स्थागुशाचे पथक नेमुन गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेवुन मिळुन आल्यास ताब्यात घेवून आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 03/03/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव व अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे व भरत बुधवंत अशांचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने लागलीच घटना ठिकाणास भेट देवुन 2 दिवस घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची माहिती घेताना वर नमुद गुन्ह्यातील आरोपी हे विंचरणा नदीजवळ काटवनात लपुन बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथका देवुन पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या. पथाकने लागलीच मिळालेल्या माहिती नुसार विंचरणा नदीपात्रा जवळील काटवनात जावुन सापळा रचुन जवळपास 2 तास काटवनात शोध घेतला असता आरोपी नामे कुणाल जया पवार हा ऊसाचे शेतात पळुन जाताना दिसला त्यास ऊसाचे शेतातून ताब्यात घेतले. त्यास त्याचा साथीदार नामे अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याचे बाबत माहिती घेवुन त्यास वाकी, ता.जामखेड येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी नामे 1) अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे वय 20, रा. पाटोदा, ता. जामखेड व 2) कुणाल जया पवार वय 22, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड यांचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) व गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझूकी कंपनीची इको कार ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे.

आरोपी नामे अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे एकुण 5 गुन्हे दाखल आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles