कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार मा. श्री.भानुदास एकनाथ कोतकर नावाने नामकरण होणार
केडगाव -कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर नावाने नामकरण सोहळा गुरुवार दिनांक १५/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता होणार असल्याची माहिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सूळ यांनी दिली.
कृषि उत्पन्न बाजार समिती, अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार आवाराचे भाग्य विधाते भानुदास कोतकर यांनी २ जानेवारी २००६ रोजी सभापती पदाची सूत्रे हाती घेतली, त्यावेळी बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न १ कोटी ७० लाख ५८ हजार होते. नगर येथील मुख्य यार्डवर कांदा या शेतीमाल उत् रविण्यासाठी जागा कमी पडत असल्याने संपूर्ण शहरामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होत होता. नगर तालुक्याचे कार्यक्षेत्रातील कांदा हा इतर मार्केटमध्ये विक्रीसाठी जात असल्याने त्याचा बाजार समितीचे उत्पन्नावर विपरीत परीणाम होत होता. भानुदास कोतकर यांनी मा. आमदार शिवाजीराव कडीले यांच्याशी चर्चा व मा.संचालक मंडळ यांना बरोबर घेऊन बाजार समितीचे उत्पन्न वाढीचे दृष्टीने व शेतकऱ्यांना त्याचा शेतीमाल नगर यार्डवर विक्रीची व्यवस्था होणेचे दृष्टीने शहरालगतच नेप्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये ३० एकर जागा खरेदी केली. या कामासाठी मा. आ. शिवाजीराव कर्डीले यांचे सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मिळालेले आहे. ज्या ठिकाणी हा उपबाजार उभा केला आहे ती संपूर्ण जागा खड्याची होती त्यामुळे संपुर्ण जागेचे सपाटीकरण करुन प्रथमतः शेतकन्याने त्याचा कांदा हा शेतीमाला विक्रीस आणलेनंतर त्याचे ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण होणेचे दृष्टीने त्या ठिकाणी ७८ हजार स्क्वेअर फुटाचे कांदा ग्रेंडिग शेडची उभारणी केली. तसेच सदर ठिकाणी ४२३ व्यापारी व कमर्शिअल गाळयांचे बांधकाम करुन भव्य अशा प्रशासकीय इमार बांधकाम केले. संपूर्ण यार्डमध्ये काँक्रीट रस्ते, ड्रेनेज लाईनचे बांधकाम तसंच वि५युत व्यवस्था करून संपूर्ण यार्डवर हायमेक्स लाईटची व्यवस्था केलेली आहे. शेतकरी मालाचे संरक्षण व्हावे म्हणून संपूर्ण यार्डला वॉल कंपौडेचे बांधकाम केलेले आहे. यार्डमध्ये कांदा घेऊन येणान्या शेतकन्यास त्याचे मालास योग्य वजन मिळावे तसेंच वजनामध्ये शेतकऱ्याची फसवणुक होऊ नये म्हणून यार्डवर प्रत्येक आडत्याकडे मापाडयाची नेमणूक केलेली आहे. तसेंच यार्डमध्ये ५० टनी वजन क्षमतेचे २ यांत्रीको भुईकाटयाची उभारणी केलेली असल्यामुळे शेतकयास त्याचे मालाचे योग्य वजन मिलत आहे. तसेंच यार्डवर उघड लिलाव पध्द्तीने कांदयाचे लिलाव होत असल्याने शेतकन्यास त्याचे मालाचा योग्य मोबदला मिळत आहे. या सर्व योजना नेप्ती उपबाजार राबविल्यामुळे यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा या शेतीमालाची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. भानुदासजी कोतकर यांनी त्यावेळी केलेल्या नेप्ती उपबाजार समितीच्या उभारणीमुळे व त्यांच्या दूरदृष्टीमुळे नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेणू म्हणून समजली जाणारी अहमदनगर कृषि उत्पन्न बाजार समिती आज राज्यातील प्रमुख बाजार समिती म्हणून उदयास आलेली आहे. त्याचाच भाग म्हणून मागील वर्षाचे बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न हे १६ कोटी ७० लाख९१ हजार ७१९ रुपये झालेले असून त्यामध्ये भानुदास कोतकर यांचा मोलाचा वाटा आहे. भानुदास कोतकर यांचे कल्पकतेतून उभारलेल्या नेप्ती उपबाजार आवारामुळे बाजार समितीचे उत्पन्न वाढलेले असून कांदा हा शेतीमाल घेऊन येणारे शेतकरी यांचाही आर्थीक स्तर ऊंचावलेला आहे. तसेंच नेप्ती उपबाजार समितीमध्ये काम करणारे आडते, व्यापारी, हमाल, मापाडी, श्री हमाल यांचेही हाताला रोजगार मिळालेला असून त्यांचेही उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहेत. बाजार समितीने शेतकरी हिताचे दृष्टीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या मुळे नेती उपबाजार समिती मध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्हा, बीड, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्हयामधून कांदा या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन मा.आ. शिवाजीराव कर्डीले ,संचालक मंडळ व नगर तालुक्यातील शेतकरी यांनी नेप्ती उपबाजार समितीस भानुदास एकनाथ कोतकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. सदरचा कार्यक्रम हा गुरुवार दिनांक १५/०८/२०२४ रोजी नेप्ती उपबाजार समिती येथे होणार आहे. या सदर कार्यक्रम साठी मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसुल व दुग्धविकास मंत्री तथा पालक मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे यांचे शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाने अध्यक्ष मा.आ शिवाजीराव कर्डीले, माजी मंत्री, तथा अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे मा. खासदार सुजय विखे मा. आमदार अरुण जगताप, सचं लिका जिल्हा सहकारी बँक,सुरेखाताई कोतकर, मा.आ.. संग्राम जगाताप, जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा भाजपचे अक्षय कर्डीले, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष,दिपक कालें उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास नगर तालुक्यातील शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल, मापाडी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ व संचालक मंडळ यांनी केले