शांतता रॅली मार्ग नोव्हेईकल झोन घोषित जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश;वाहतुकीत बदल
अहमदनगर -दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे (रा.आंतरवली सराटी जि.जालना) यांच्या उपस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी अहमदनगर शहरात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.या रैलीकरिता २५ ते ३० हजार मराठा समर्थक शहरात येण्याची शक्यता असल्याने रॅली मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे.अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची तसेच पादचारी लोकांची रहदारी असते. त्यादृष्टीने सदर रॅलीमध्ये सामील होणारे नागरीकांचे सुरक्षिततेस सार्वजनिक वाहतुकीमुळे धोका पोहोचुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे १२ ऑगस्ट २०२४ रोजी १२:०० ते १८:०० पावेतो रॅलीचे मार्गावरील वाहतुकीचे नियमन बदल करीत सदर रॅली मार्ग नोव्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र) घोषीत केले आहे.
खालील नमुद मार्ग “नो व्हेईकल झोन (वाहन विरहीत क्षेत्र)” (रॅलीतील वाहने सोडुन) घोषीत केल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसा आदेश जारी केला आहे.
इम्पेरियल चौक-माळीवाडा-पंचपीर चावडी-तख्ती दरवाजा-माणिक चौक-कापड बाजार-तेलीखुंट चितळे रोड- चौपाटी कारंजा/
तसेच इम्पेरियल चौकाकडे दोन्ही बाजुने येणारी सर्व प्रकारची वाहने/वाहतुक ही खालील मार्गाने जातील
१)कायनेटीक चौकाकडुन इम्पेरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
कायनेटीक चौक शिल्पा गार्डन समोरुन उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील
२)पाथर्डी रोडने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
जीपीओ चौक बांदणी चौक उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील. अथवा/जीपीओ चौक कोठला एसपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
३)सोलापुर व जामखेड कडुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
चांदणी चौक उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील अथवा / चांदणी चौक जीपीओ चौक मार्गे इच्छित स्थळी जातील
४)एसपीओ चौकाकडुन इम्पेरियल चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी मार्ग
एसपीओ चौक कोठला उड्डाणपुलावरुन इच्छित स्थळी जातील
हा आदेश शासकीय वाहने,अॅब्युलन्स, फायर ब्रिगेड,रॅलीमधील परवानगी दिलेली वाहने व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.