नवीन होमगार्ड सदस्यांची तात्पुरती अंतिम यादी प्रसिद्ध
अहमदनगर दि.२०- जिल्हा होमगार्डमधील विविध पथकांच्या रिक्त ठिकाणी ५२२ नवीन होमगार्ड सदस्यांची पथकनिहाय तात्पुरती अंतिम यादी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर तसेच जिल्हा होमगार्ड कार्यालयातील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सदस्यांना काही आक्षेप असल्यास त्यांनी dchgahmadnagar@yahoo.com या ई-मेल अथवा जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिद्धीबागेजवळ, अहमदनगर येथे २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन होमगार्डचे जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी केले आहे.