अहमदनगर (श्रीगोंदा)-घनश्याम शेलार यांचा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस मध्ये प्रवेशघनश्याम शेलार यांची ओळख
घनश्याम शेलार सुरवातीला पत्रकार, छायाचित्रकार होते. युवा मोर्चाच्या माध्यमातून ते पुढे भाजपमध्ये आले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेथे त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले. त्यांच्या काळात नगरला राष्ट्रवादी काँग्रेसचे भव्य राष्ट्रवादी भवन ऑफिस झाले. पुढे उमेदवारी देण्यावरून खटकले आणि त्यांनी पक्ष सोडला.
नंतर शिवसेना असा प्रवास करून ते पुन्हा राष्ट्रवादीत आले. मागीलवेळी माजी आमदार राहुल जगताप यांनी विधानसभा लढण्यास नकार दिल्याने शेलार यांना उमेदवारी दिली गेली. त्यांचा बबनराव पाचपुते यांनी थोडक्यात पराभव केला. त्यानंतर यावेळीही ते इच्छुक होते. मात्र मधल्या काळात विविध माध्यमांतून पुन्हा राहुल जगताप यांची ताकद वाढत गेली. पक्षही त्यांना अनुकूल आहे. त्यामुळे शेलार यांना असुरक्षित वाटत असावे त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बदलून बीआरएसची वाट धरली त्यानंतर त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.