Sunday, July 14, 2024

Ahmednagar news-धनादेश न वटल्याने 2 महिन्यांची साधी कैद चार लाख रु.लाख दंड

श्री सदगुरु पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे फेडी साठी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून कर्जदार संजय बाजीराव बडे यास दोन महिने शिक्षा व चार लाख रुपए दंड……
अहमदनगर- येथील श्री सदगुरु ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून कर्जदार संजय बाजीराव बडे याने कर्ज घेतले होते. थकीत कर्ज फेडी साठी त्याने पतसंस्थेस धनादेश दिला होता. सदर धनादेश पतसंस्थेने त्यांचे खात्यात वटविण्यासाठी भरला असता तो चेक वटला नाही व पतसंस्थेस कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून पतसंस्थेने अहमदनगर येथील चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब यांचे कोर्टात निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स ॲक्ट चे कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केली. सदर केस ची पुढील सुनावणी 13 वे अतिरिक्त
मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती गजाला अल अमुदी शेख साहेब यांचे समोर झाली. फिर्यादी पतसंस्थेकडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच अवश्यक तो कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आला. फिर्यादिची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी संजय बाजीराव बडे यास दोषी धरून त्याला न्यायाधीश श्रीमती गजाला अल अमुदी शेख साहेब यांनी फौ.प्र.सं. 1973 चे कलम 255-2 नुसार तथा परक्राम्य संलेख अधिनियम 1881 चे कलम 138 मध्ये दोषी धरून दोन महिन्याची साधी कैद व रुपये चार लाख दंड अशी शिक्षा दिली आहे. तसेच दंड न भरल्यास चार महिने साधी कैद देण्यात आली आहे. आरोपीने दंडाची रक्कम कलम 357-1 नुसार फिर्यादीस एक महिन्याच्या आत द्यावेत असा आदेश करण्यात आला आहे.
फिर्यादी पतसंस्थे कडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. संस्थेकडून ॲड शिवाजी अण्णा कराळे , ॲड करुणा रामदास शिंदे व ॲड सत्यजीत शिवाजी कराळे यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles