Tuesday, January 21, 2025

अहमदनगर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया पाच संवर्गांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मधील पाच संवर्गांसाठी 18 ते 30 जुलैदरम्यान ऑनलाईन परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून परीक्षा केंद्र आणि पेपरच्या शिफ्टची माहिती नंतर कळवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, 2023 मध्ये भरती जाहीर झालेल्या नगरसह राज्यातील जिल्हा परिषदांमधील 19 पैकी 11 संवर्गांची परीक्षा कशीबशी डिसेंबर 2023 पर्यंत झाली होती. मात्र, पाच संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक गेल्या सहा महिन्यांपासून जाहीर होत नव्हते. अखेर आता ते जाहीर झाले आहे.

त्यानुसार राज्यातील अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातील आरोग्य सेवक पुरूष 40 टक्के, आरोग्य सेवक पुरूष 50 टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला), कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका-पर्यवेक्षक या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्य सेवक पुरूष 40 टक्के (पुरूष), व 50 टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गासाठीचे ऑनलाईन परीक्षेचे वेळपत्रक जाहीर झाले आहे. राज्यातील नगरसह 13 जिल्ह्यांतील पेसा भागातून भरतीला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे ही भरती अर्ध्यावरच थांबली होती. त्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होती, यामुळे भरती प्रक्रिया लांबली होती
यात मुख्य सेविका- पर्यवेक्षिका 18 जुलै, आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला) 19 जुलै, आरोग्य सेवक पुरूष 40 टक्के 22 आणि 23 जुलै, आरोग्य सेवक पुरूष (हंगामी फवारणी कर्मचारी) 23 व 24 जुलैला आणि कंत्राटी ग्रामसेवक यांची 25, 29 आणि 30 जुलैला ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्र आणि पेपरच्या शिफ्टची माहिती लवकरच कळवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

2023 मध्ये राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी सरळसेवा कोट्यातून भरती घोषित केली. त्यानुसार नगरसह राज्यात जिल्हा परिषदांची 19 हजार पदांची भरती प्रक्रिया अडखळत सुरू होती. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती होत आहे. नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात 5 ऑगस्ट 2023 ला प्रसिद्ध केली होती. जिल्हा परिषदेच्या 19 संवर्गांतील 937 पदे भरण्यात येणार होेते. त्यात सर्वाधिक 727 पदे आरोग्य विभागाची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. त्यामुळे या भरतीसाठी जिल्ह्यातून 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरल्यानंतर दोन महिन्यांनी 3 ऑक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles