Tuesday, February 11, 2025

शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या कोट्यावधी रुपयाच्या फसवणुक प्रकरणी यू टर्न.. तिघांविरोधात तक्रार नाही…

नगर (प्रतिनिधी)- जमीन व्यवहारात कोट्यावधी रुपयांची फसवणुक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या संबंधी काही क्षेत्र जाधव यांच्या नावावर खरेदीखत केल्याने त्यांनी यामधील तीन जणांच्या विरोधात कुठलीही तक्रार व हरकत नसल्याचे व त्यांनी दिलेले न वटलेले धनादेश तक्रारी शिवाय परत करत असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे. यामुळे सदरील तीघांचा गुन्ह्यातून निसटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकतेच 30 मे रोजी कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाधव यांनी मयूर रंगनाथ वैद्य (रा. बालमटाकळी, शेवगाव), वैशाली योगेश गायकवाड (रा. नाशिक) व नितीन सोपानराव तुपे (रा. आगरकर मळा, नगर) व इतर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
त्या बदल्यात काही क्षेत्र माझ्या नावावर खरेदीखत करून दिले आहे. उर्वरित रकमेचे न वटलेले चेक कोणत्याही तक्रारी शिवाय त्यांना परत देत आहे. संबंधीतांनी केलेले आर्थिक नुकसान यामुळे भरून निघत असल्याकारणाने त्यांच्या विरोधात कोणतीही प्रकारची हरकत व तक्रार राहिलेली नसल्याचे बांधकाम व्यावसायिक अनिल जाधव यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles