अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान याबाबत मुंडे समर्थकांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डीत बंदची हाक देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित युवकाच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेल्याचे समजताच पोलिसांनी मोठा फौजफाटा शिरापूर येथे तैनात केला होता. संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.