अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतले आहे त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरूपयोग करण्यात आला असल्याचा आरोपही नीलेश लंके यांनी केला आहे
नीलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क, विरोधकांवर सोडले टीकास्त्र
- Advertisement -