नगर शहरातील डी.एस.पी. चौक व सह्याद्री चौक येथील उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी भुमिपुजन समारंभाचे आयोजन करून नागरिकांना फसविण्याचा प्रयत्न – माजी नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेना ठाकरे गट
भुमिपुजन समारंभासंदर्भात वस्तुस्थिती मित्रांनो, सत्ताधारी यांच्या प्रयत्नातून डी.एस.पी. चौक (रु.७१ कोटी) व सह्याद्री चौक (रु.५१ कोटी) येथील उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी भुमिपुजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की या कामासाठी अद्याप कोणताही वर्क ऑर्डर जारी झालेला नाही आणि कोणताही टेंडर देखील निघालेला नाही. कायद्याने, वर्क ऑर्डर आणि टेंडर निघाल्याशिवाय कोणतेही बांधकामाचे उद्घाटन समारंभ करणे अवैध आहे आणि जनतेला दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. आम्ही या गोष्टीचा कडक निषेध करतो आणि संबंधित प्राधिकरणांनी त्वरित या बाबींची दखल घ्यावी, अशी मागणी करतो. जनतेला खोटी आश्वासने देणे आणि दिशाभूल करणे हा विरोधकांचा प्रपंच आहे. जनतेची दिशाभूल करणे योग्य आहे का?