Monday, December 9, 2024

मयत व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून प्लॉटची विक्री, नगर शहरातील धक्कादायक घटना

नगर – बनावट कागदपत्रे तयार करून मयत व्यक्तीच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून २ प्लॉटची परस्पर खरेदी करत नोकरदार व्यक्तीची व त्याच्या कुटुंबियांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशांत अर्जुन शेकटकर (वय ५२, रा.बोरुडे मळा ) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुवेंद्र संतोष डाबी (रा. सौरभ कॉलनी, सुरज कॉम्प्लेक्स, राघवेंद्रस्वामी मंदीर जवळ, बोल्हेगाव), फिर्यादीच्या मयत वडीलांच्या जागी उभा केलेला तोतया इसम, तसेच लिहून देणारा व लिहून घेणारा यांना व्यक्ती ओळख देणारे साक्षीदार शरद विनायक कांबळे (रा. सातभाई गल्ली, चितळे रोड), सचिन शरद कांबळे (रा. सातभाई गल्ली, चितळे रोड), अजय वसंत दराडे (रा.बागडपट्टी, अहमदनगर), विनायक मच्छिंद्र सोन्नीस (रा.बागडपट्टी, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. यातील विनायक सोन्नीस वगळता इतर ५ जणांना कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (दि.२५) रात्री अटक केली आहे.

फिर्यादी शेकटकर यांच्या वडिलांच्या नावे वडगाव गुप्ता शिवारात स.नं. ७ मध्ये प्लॉट नं. १ चे क्षेत्र ११४.०५ चौ.मी. व प्लॉट नं. १ चे क्षेत्र १११.०५ चौ.मी. हे दोन्ही प्लॉट होते. वरील ६ आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या मयत वडिलांच्या जागी तोतया इसम उभा करून व त्याचे बनावट कागदपत्र तयार करून सह. दुय्यम निबंधक वर्ग – २ कार्यालयात बनावट खरेदी दस्त नंबर ७४८०/२०२२ तयार करून या दोन्ही प्लॉटची परस्पर विक्री करत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांची फसवणूक केली.

हा प्रकार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी घडला होता. तो आता फिर्यादीच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सर्व चौकशी करून गुरुवारी (दि.२५) दुपारी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी ६ जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर पो.नि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी स.पो.नि. योगिता कोकाटे व पोलिस पथकाने रात्री ५ जणांना अटक केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles