Tuesday, February 27, 2024

अभिषेक कळमकर म्हणतात…चिंता नाही, आमच्याकडे शरद पवार नावाचा ‘ब्रॅण्ड’ आहे…

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेला निकाल धक्कादायक असला तरी अनपेक्षित आहे असेही म्हणता येणार नाही. कारण मागील काळात शिवसेना ठाकरे गटाबाबत जे घडलं तेच आता आदरणीय शरद पवार यांच्या पक्षाबाबत घडलं आहे. ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचाच पक्ष नाही, हे अजब आहे. सरळसरळ केंद्रीय यंत्रणांनी स्वायत्तता गमावली आहे हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.अशी प्रतिक्रिया माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, पक्ष आणि चिन्हं गेलं असलं तरी आमच्याकडे आदरणीय शरद पवार साहेब हा ब्रॅण्ड आहे. महाराष्ट्राने मागील ५५ वर्षांपासून शरद पवारांना साथ देताना कधीही त्यांचा पक्ष, चिन्ह पाहिले नाही हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. आज जे पक्ष मिळाला म्हणून खुष असतील, त्यांनाही जाणीव आहे की आपल्या पाठीशी आता मोठे पवार साहेब नाहीत. कारण गेली अनेक वर्षं ते सगळे पवार साहेबांमुळेच मोठे झाले आहेत. त्यामुळे पक्ष, चिन्ह गेलं याची खूप काही चिंता करावी असे अजिबात नाही. पवार साहेब योद्धा आहेत. संघर्ष कसा करायचा हे त्यांना माहीत आहे. आम्ही सगळे पक्षाचे नवीन नाव, चिन्ह जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून. शेवटी शरद पवार नावाचा विचार हाच लोकांना भावणारा आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्रात काय किंवा नगरमध्ये काय, खूप फरक पडेल अशी परिस्थिती नाही. आज देशात, राज्यात भाजपच्या सत्तेविरूद्ध रोष आहे. महागाई, शेतकरी, बेरोजगारी असे मूलभूत प्रश्न जनतेला भेडसावत आहेत. त्याऐवजी भाजपकडून सत्तेचा दुरूपयोग पक्ष फोडणे, सरकार पाडणे, विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासाठी केला जातो आहे. जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. त्यांच्या मनातील चीड मतदानातून व्यक्त होईल. आपल्या नगरमध्येही आज अनेक प्रश्नांमुळे लोकप्रतिनिधी विषयी तीव्र नाराजी आहे. शहरात व्यापक जनसंपर्क मोहीम राबवून आगामी निवडणुकीसाठी जनमत पवार साहेबांच्या बाजूने तयार करण्यावर भर दिला जाईल.
👏🏻👍🏻

त्यांनी म्हटले आहे की,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles