Wednesday, February 28, 2024

माणुसकीला काळीमा फासणारी घटना…. अहमदनगरमध्ये फरार आरोपी जेरबंद….

अहमदनगर (दि.२९ डिसेंबर):-पुण्यात स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा फरार आरोपी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने शिर्डीतून जेरबंद केला आहे.दि.28 डिसेंबर 23 रोजी श्री.साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि अण्णासाहेब परदेशी सुरक्षा अधिकारी यांनी डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील तीन दिवसापासून एक इसम साईउद्यान येथे राहण्यास आहे.डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की,माझ्याविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यापासून बेंगलोर, राजस्थान,बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे.
त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे या आरोपी बाबत चौकशी केली असता त्यांनी कळविले की,या आरोपी विरुद्ध दि10/11/2023 रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या आरोपीने आपल्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचेवर एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्याची गरोदर आहे.त्याचे विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 547/2023 भादवी कलम 376 (2)(f),( j),376(2)(3),(n),323,506 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5(j),(2),5(L),6,8,12 कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.या आरोपीस शिर्डी येथे पकडून आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles