Saturday, October 12, 2024

ahmednagar accident: कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात; १ जण ठार, एक जखमी

ahmednagar accidentकोपरगाव शहरातील पुणतांबा फाट्याजवळ रविवारी एका कंटरने दुचाकीला धडक दिल्याने टायरखाली चिरडून दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यु झाला असून दुचाकीवरील दुसरा इसम गंभीर जखमी आहे. जखमीवर एसजेएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.दुचाकीवरील दोघे कोपरगाव शहरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरातील दोघे दुचाकीस्वार रविवारी दुपारी शिर्डीच्या दिशेने जात असताना त्याच दिशेने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक टी एन 88 के 9937 ने धडक दिल्याने ते खाली पडले आणि त्यातील एक जण मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या इसमाच्या पायावरून कंटेनरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी दिगंबर शेलार, सुशील शिंदे,श्री.काठे घटनास्थळी पोहचले आणि अपघात झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल केले.तसेच वाहतूक सुरळीत केली. घटना घडल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे. दरम्यान अपघातात कोणाचा मृत्यू झालाय? त्याची ओळख पटविण्याचे काम आणि जखमी इसम कोण त्याचे नाव काय याची माहिती शहर पोलीस घेत आहे.

दरम्यान सध्या नगर मनमाड महामार्ग अर्थात् नॅशनल हायवे ७५२ जी चे काम सुरू असून सदर काम अत्यंत संथ गतीने होत आहे. तसेच ठेकेदारापुढे काही अडचणी देखील आहे. सध्या वापरात असलेल्या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहे. संबंधित ठेकेदाराने किमान या रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles