Tuesday, June 25, 2024

Ahmednagar accident news: रुग्णवाहिका आणि एसटी बसचा अपघात

संगमनेर तालुक्यातील कोंची येथून अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन येत असलेली रुग्णवाहिका आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस यांच्यात समाेरासमाेर धङक झाली. रुग्णवाहिका चालक आणि इतर जखमी झाले. जखमींची नावे समजू शकली नाहीत. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हा अपघात रविवारी (दि. २६) रात्री पावणेआठच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमार्गावर कोकणगाव शिवारात झाला.
काेंची शिवारातील अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चालक रुग्णवाहिका घेऊन अपघातस्थळी गेला होता.

जखमीला रुग्णालयात घेऊन येत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. संगमनेरातील कुटे हॉस्पिटल ॲण्ड लॅप्रोस्कोपी सेंटरची रुग्णवाहिका आणि परिवहन महामंडळाच्या मालेगाव (जि. नाशिक) आगाराची पुणे-मालेगाव बस या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले. रुग्णवाहिकेचा चालक आणि इतर जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून बाहेर काढले. त्यांना संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles