Sunday, July 14, 2024

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ओढ्यात गाडी उलटली; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

नेवासा तालुक्यातील नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटानजिक असलेलया घाडगे ओढ्यात गाडी उलटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.

या अपघातात एक लहान मुलगी बचावली. मयतांमध्ये एका लहान मुलीसह तीन महिला व चालकाचा समावेश आहे. अपघातात मृत पावलेले सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असून ते छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलिसांसह नेवासा फाटा परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी मदत केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles