अहमदनगर-सुपा बस स्थानक चौकात एका पिकअपने पाच वाहनांना जोराची धडक दिली आहे. या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर तीन चार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात सकाळी दहाच्या सुमाराम घडला आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पिकअप चालक सोहेल शेख (रा. छञपती संभाजीनगर) बेजाबदारपणे वाहन चालवत पुण्याहून छञपती संभाजीनगरच्या दिशेने जात असताना सुपा बस स्थानक चौकात आल्यावर प्रथम त्याने एका कारला जोराची धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाल्याने पिकअप चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु धडक दिल्याने त्याच्या गाडीचा बँलस हालल्याने पुढे तो एका उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला. यात रिक्षाचे मोठे नुकसान होऊन आतील व्यक्तीला जोरदार मार बसला. पुढे हा पिकअपने उभ्या असलेल्या दोन मोटारसायकलस्वाराना जोराची धडक दिली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच त्या दोन मोटारसायकल चालकाना धडकून पुढे हीच पिकअप चाललेला आणखी एका कारला जोरात धडकली व थांबली