Monday, April 22, 2024

निवडणुक काळात आश्वासने देणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये : आ. संग्राम जगताप

निवडणुक काळात आश्वासने देणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये – आमदार संग्राम जगताप

नगर : निवडणुकांचा कार्यकाळ आता सुरू झाला असून विविध राजकीय पक्षाचे पुढारी तुमच्याकडे यायला सुरू होतील, वेगवेगळ्या प्रकारची आश्वासने देतील, मात्र यांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या सुखदुःखात बरोबर राहणाऱ्या व विकासाचे कामे मार्गी लावणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहावे, शहर विकासाचे नियोजनबद्ध काम सुरू आहे, राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून शहरात टीम वर्कच्या माध्यमातून दर्जेदार विकासाची कामे मार्गी लावली जात आहे. प्रभागामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणारे नेतृत्व नागरिकांनी निवडून द्यावे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी स्टेशन परिसरामध्ये विकासाच्या कामासाठी पाठपुरावा करत मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळेच स्टेशन परिसरामध्ये विकासाची कामे उभी राहिली आहे. काटवण खंडोबा रस्त्याचे काम सुरू झाले असून लवकरच मार्गी लागले जाईल त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी सुरक्षित मार्ग म्हणून ओळखला जाईल तसेच या परिसराच्या विस्तारीकरणासाठी व सुशोभीकरणासाठी मदत होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
आगरकर मळा येथे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी प्रा. माणिकराव विधाते, मा.नगरसेवक विजय गव्हाळे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार, ज्येष्ठ नागरिक केशव खानदेश़े, अशोक आगरकर, दत्ता खैरे, प्रभाकर आगरकर, प्रदीप आगरकर, दिलीप आगरकर,सुनील आगरकर, शिवाजीराव ससे,नानासाहेब दळवी,दत्तात्रय फुलसौंदर,शामराव व्यवहारे, अनिकेत आगरकर,अभिनंदन आगरकर,यश आगरकर,अमित आगरकर, अँड. विजयराव लुणे, रंगनाथ उकांडे,कोरडे, अशोकराव कानडे,अरुण नाणेकर,गोरक्षनाथ गीते,सचिन भूतारे,बबलू पुंड,दिपाली आगरकर,सुनिता आगरकर,रेखा विधाते,चंद्रकला आगरकर,लता आगरकर, शोभा आगरकर, पुष्पा आगरक,र सुरेखा आगरकर,अरुणा आगरकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles