Tuesday, December 5, 2023

अहमदनगर पर्यटकांनो सावधान…फुलोत्सव पाहण्यासाठी गेलेले दोघेजण पाण्यात बुडाले

अकोले तालुक्यात फोपसंडी येथे फुलोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या चार पर्यटकांपैकी दोघेजण पाण्यात बुडाले आहेत. हे तरूण संगमनेर येथील असल्याचे ग्रामसेवक संजय दुशींग यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत या तरुणांना शोधण्याची मोहिम सुरू होती.

संगमनेर येथील अभिजित वर्पे, पंकज पाळंदे, सिध्दांत वाबळे व सिद्धार्थ वाबळे हे चार तरूण दोन दुचाकीवरून फोपसंडी येथे फुलोत्सव पाहण्यासाठी गेले होते.हे तरूण महाविद्यालयीन असल्याचे समजते.

पैकी अभिजित वर्पे व पंकज पाळंदे दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाच्या पश्चिमेला असलेल्या ‘पाणवठ्याच्या ओढयात पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले मात्र या ठिकाणी खोल गर्ता असल्याने ते बुडू लागले.
ते पाहून बरोबर असलेल्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत गाव गाठले.गावातील लोक जमा झाले. सिध्दांत व सिद्धार्थ वाबळे पुर्ण भेदरलेल्या अवस्थेत असल्याने गावकर्‍यांनी धीर देत शोधकार्य सुरू केले.

सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच महसूल ब पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अंधार पडल्याने मदत कार्यात अडथळे येत होते.

तरीही ग्रामस्थांच्या मदतीने प्रशासनाने शोध मोहिम सुरू ठेवली. पर्यटकांनी भंडारदरा- फोफसंडी परिसरात पर्यटनाला येताना स्थानिक गाईड अथवा ग्रामस्थांकडून माहिती घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याने सोशल मीडिया व अन्य माध्यमांतून जंगल,धबधबे, फुलोत्सव, हिरवळ असे अनेक आकर्षक फोटो, व्हिडिओ शेअर होतात. त्यातून पर्यटक येथे जाण्यासाठी आकर्षित होतात.
सध्या फोपसंडी येथे जाण्यासाठी रस्ता अत्यंत खराब आहे. तसेच जंगलात फिरताना सरपटणारे प्राणी, कडे, आणिदरडी कोसळणेहे प्रकार जास्त असल्याने वन्यजीव अधिकारी यांच्या परवानगीनेच जंगलात जावे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: