Saturday, October 5, 2024

सफाई कामगारांचं योगदान एसीमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे ,खासदार नीलेश लंके

सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार व कौतुक सोहळा सफाई कर्मचाऱ्यारी भाऊक खासदार नीलेश लंके

नगर : प्रतिनिधी अहमदनगर महानगरपालिकेच्या सफाई कामगार बांधव व भगिनींनी ज्या समर्पणाने आणि निष्ठेने आपल्या शहराची स्वच्छता कायम ठेवली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान केला. आपल्या रस्त्यांपासून ते गटारांपर्यंत, मोकळ्या जागांपासून ते चेंबरांपर्यंत सफाई कामगारांनी आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. सफाई कामगारांचं योगदान एसी केबिनमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा कौतुक सोहळा सत्कार खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आला. माजी नगरसेवक योगीराज गाडे, शहर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे,ज्ञानेश्वर येवले, भैय्या परदेशी,गाडे, विशाल वालकर, रामेश्वर सोलाट,राजेंद्र दळवी,ओमकार सातपुते आदी उपस्थित होते.

लंके म्हणाले, चार घरात जर आमच्या मदतीमुळे आनंदाची चूल पेटणार असेल तर तुम्हाला समाधान पाहीजे. कामगाराच्या बाबतीत राजकारण करू नका. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, कामगाराचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करू. सफाई कामगाराना बुट, हॅडगोल्ज मिळत नाही ही कोणती महानगरपालिका आहे ? यांच्यापेक्षा छोटया ग्रामपंचायती चांगल्या आहेत. सुविधा न मिळता बीलेही काढली जात आहेत? गरीबांचे टाळूवरचे लोणी किती दिवस खाणार ?चार दिवस सासूचे चार दिवस सूनेचे असतात. आज तुम्ही सूपात असाल तर उदया जात्यात जाणार आहात. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणे ही आमची सर्वाची विचारधारा असल्याचे लंके म्हणाले.

गाडे म्हणाले, आज सफाई कर्मचाऱ्याला वाली मिळाला आहे. खासदार नीलेश लंके यांनी पाठीवर थाप टाकली, त्यामुळे आज भारावून गेलो आहोत. पहिल्यांदा खासदारांच्या हस्ते मनपा सफाई कर्मचाऱ्याचा सन्मान होत असून प्रथमच हा सोहळा कर्मचारी अनुभवत आहेत. सामान्यबददलची आस्था यातून दिसून येत असल्याचे गाडे म्हणाले.

स्वच्छतेच्या सेवेला सलाम!

सफाई कर्मचारी बांधव आणि भगिनींनी आपल्या कामातून अहमदनगर शहराला स्वच्छतेचा आदर्श दिला आहे. माझा माणूस हा आनंदी झाला पाहीजे मोठयाचा सत्कार तर कोणीही करतो. परंतू तुमच्या सारख्या गरीबांचा सत्कार मला करायचा होता. सफाई कामगारांशी माझ नात आहे, नात्यागोत्यातील लोकांकरीता काहीतरी केले पाहीजे. असे खा. लंके यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles