नगर शहरात महापालिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले मराठा व खुल्या वर्गाचे आरक्षण सर्व्हेक्षण वादात सापडले आहे. पहिली इयत्ताही पास नसलेले काही प्रगणक सर्व्हेक्षणात असून, त्यांच्याकडे अँड्राईड मोबाईल नसल्याने प्रश्नावली भरता येत नाही व इंग्रजीतून नावही टाईप करता येत नाही. यामुळे मनपा कामगार संघटना आक्रमक झाली असून, पहिली ते नववी शिकलेल्या मनपा कर्मचार्यांना या सर्व्हेक्षणातून वगळण्याची मागणी त्यांची आहे. याबाबत त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.
नगर शहरात दोन दिवसात सुमारे १० हजारापर्यंत घरांचे सर्व्हेक्षण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या सर्व्हेक्षणात मनपाचे काही बिगारी पदावर काम करणारे कर्मचारी प्रगणक असून, यापैकी अनेकांचे शिक्षण कमी आहे व त्यांना लिहिता-वाचताही येत नाही. त्यांच्याकडे आधुनिक मोबाईल नाही. त्यामुळे सर्व्हेक्षण अॅप डाऊनलोड करता येत नाही तसेच सर्व्हेक्षण करताना संबंधिताचे नाव इंग्रजीमधून त्या अॅपवर लिहावे लागत असल्याने व इंग्रजीचा गंधही नसल्याने अशा लोकांकडून सर्व्हेक्षण करणे म्हणजे त्या लोकांवर व सर्व्हेक्षणावरही अन्याय असल्याचे म्हणणे मनपा कामगार संघटनेचे आहे. त्यामुळे याबाबत मनपा आयुक्तांसह राज्य मागासवर्ग आयोग तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. पहिली पास असलेल्या सर्व्हेक्षणातील त्याच्या अडचणी मांडल्या असून, तो व्हीडीओ व्हायरल झाल्याने मनपा अधिकार्यांनी त्याला कारवाईची धमकी दिल्याचा दावाही लोखंडे यांनी केला आहे.
मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी पहिली पास कर्मचारी नियुक्त,नगर मनपाचा अजब कारभार… मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार
- Advertisement -