Wednesday, February 28, 2024

नगर मनपा कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, प्रशासकांचे स्पष्ट आदेश

नगर : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी होणाऱ्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दि. १९ जानेवारीपर्यंत कोणालाही सुट्टी देऊ नये, असे आदेश आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

शहरात सर्वेक्षणासाठी किमान ३ हजारांवर कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. यात ५०० मनपा कर्मचारी व इतरांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजले. राज्य शासनाने येत्या आठवडाभरात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश काढले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी काल, गुरुवारी बैठक घेऊन यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार नगर शहरातील सुमारे ५ लाख लोकसंख्या असलेल्या सव्वालाख कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. जनगणनेसाठी केलेल्या प्रगणक गटानुसार हे सर्वेक्षण करण्याचे नियोजन मनपाच्या पातळीवर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles