Saturday, October 5, 2024

19 सफाई कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या कायम सेवेत आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

मनपा कर्मचारी युनियनच्याच पाठपुराव्याला यश – अध्यक्ष बाबासाहेब मुदगल.

नगर – अहमदनगर महानगरपालिकेच्या 19 सफाई कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार कायम सेवेचे नियुक्तीपत्र आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अहमदनगर मनपा युनियनच्या वतीने लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात म्हणून याचिका दाखल केली होती. त्यानुसार संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले अशी माहिती युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिली.
अहमदनगर मनपाच्या 19 सफाई कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या कायम सेवेचे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सरसर ,सचिव आनंद वायकर, माजी नगरसेवक विपुल शेटिया, सुरेश बनसोडे, काका शेळके, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़ , अजित तारु,अकील सय्यद आदी उपस्थित होते.

मनपा कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करत आपले कर्तव्य पार पडत असतात ऊन, वारा, पाऊस संकट काळात देखील जीवाची परवा न करता सर्वात आदी रस्त्यावर येण्याचे काम मनपा कर्मचारी करतात कोविड संकट काळामध्ये नगरकरांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या अहोरात्र उपलब्ध होणाऱ्या मनपा मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सदैव पाठीशी उभा आहे. सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला आहे मनपा कर्मचारी युनियनच्या पाठपुराव्याला यश आल्यामुळेच आज 19 वारस हक्काचे सफाई कर्मचारी मनपात कायमसेवेत रुजू झाले असल्याची माहिती आ.संग्राम जगताप यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles