Wednesday, April 30, 2025

अमृत पाणी योजना पूर्ण, नगरला आता मुबलक पाणीपुरवठा, 30 डिसेंबरला लोकार्पण

नगर शहराचा अमृत पाणी योजनेमुळे पाणी प्रश्न सुटला – आ. संग्राम जगताप

नगर : केंद्र व राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून अमृत पाणी योजनेचे काम मार्गी लागले असून या कामाचा लोकार्पण सोहळा 30 डिसेंबर रोजी वसंत टेकडी येथे खा.डॉ. सुजय विखे पाटील व आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून कार्यक्रम स्थळाची नियोजना संदर्भात पाहणी केली आहे, यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मुळा धरण येथून 1972 सालामध्ये नगर शहराला पाणी पुरवठा करणारी पहिली योजना झाली आहे त्या नंतर शहराचे विस्तारीकरण व नागरी वसाहती झपाट्याने वाढत असल्यामुळे नगरकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते, पण आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मुळा धरण ते विळद घाट आणि विळद घाट ते वसंत टेकडी पर्यंत अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून वसंत टेकडी येथील ५० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी पडले आहे, फेस टू योजनेअंतर्गत शहरामध्ये विविध भागात पाण्याच्या टाक्या उभारल्या असून त्यामध्ये अमृत पाणी योजनेचे पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे नगरकरांना पूर्ण दाबाने आणि वेळेवर पाणी पुरवठा होणार आहे अनेक वर्षाचा शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे.असे ते म्हणाले. यावेळी जल अभियंता परिमल निकम,माजी नगरसेवक निखिल वारे, इंजि. गणेश गाडळकर, साहेबान जहागिरदार, इंजि.शिंदे, वैभव वाघ, सागर गोरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles