कर्जत प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नगर दि.२: एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कर्जत अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून १९ सप्टेंबर २०२४ पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना कर्जत येथे अर्ज मागविण्यात आले आहेत.
सहकारनगर, सोलनकरवस्ती, माळवेवस्ती, टेंभेवस्ती, खातगाव, बाभुळगाव दुमाला, भिताडेवस्ती, गव्हाणेवस्ती, जाधववस्ती, तोडकरवाडी दत्तमंदिर, भोपाळबेट फिरंगाईनगर, झणझणेवस्ती, नलगेवस्ती, नाथाचा पत्रा, जगदाळेवस्ती, जेबेवस्ती, बाडोहववस्ती, फरताडेवस्ती, गोयकरवाडा, निंबाळेवस्ती, मुंगुसवाडा,टकलेवस्ती, वाळुंजकरवस्ती, नवसरवाडी-२, पिराची वस्ती, हंडाळवस्ती, शिंदेवस्ती, आनंदवाडी, धुमकाईफाटा, थोरातवस्ती, मथेवस्ती, जगतापवस्ती, माळेवस्ती, सस्तेवस्ती, तांबे शितोळे वस्ती आणि पाटीलवस्ती केंद्रावर अंगणवाडी मदतनीसाची पदे भरावयाची आहेत.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १७ सप्टेंबर २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहील. अर्जदारास 2 अपत्याचे वर अपत्य नसावे. अंगणवाडी मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. उमेदवाराने सर्व शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.
अर्जाची छाननी अंतिम मुदतीनंतर १५ दिवसात करून प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर १० दिवसात कार्यालयात हरकत नोंदविता येईल. आलेल्या हरकतींवर सुनावणी घेवून त्वरीत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
विहीत नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कर्जत येथे संपर्क साधावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी प्र.व.मिटकरी यांनी केले आहे.