Saturday, December 9, 2023

अहमदनगर भाव कमी करा म्हटल्याचा राग, फळ विक्रेत्याने ग्राहकाच्या डोक्यात घातला कोयता

अहमदनगर-सफरचंदाचा भाव कमी करण्यास सांगितल्याने विक्रेत्याने घातला ग्राहकाच्या डोक्यात कोयता श्रीगोंद्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान (सर्व रा. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढळगाव येथील तरुण श्रीगोंद्यात फळ खरेदीसाठी अतिक बागवान, अजहर बागवान, जुबेर बागवान यांच्या रस्त्यावरील दुकानात गेले असता प्रेमदास उबाळे (रा. आढळगाव यांनी यातील फळविक्रेते बागवान यांच्याकडे सफरचंद विकत घेताना फळविक्रेत्याला सफरचंद बारीक आहेत. भाव व्यवस्थित लावून दे असे म्हणाले. याचा राग आल्याने फळविक्रेत्या तीन जणांनी वाद सुरू करत यांना जिवंत सोडू नका रे हे लई शहाणपण करतायेत असे म्हणत शिवीगाळ करून फळविक्रेते जुबेर बागवान यांनी हातातील नारळ फोडण्याच्या कोयत्याने आणि जीव ठार मारण्याच्या उद्देशाने फळ घेणारे ग्राहक प्रेमदास उबाळे यांचे डोक्यात मारून गंभीर दुखापत केली असल्याने फळविक्रेत्या बागवान बंधू विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d