महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी नगर बाजार समितीचे सहाय्यक सचिव सचिन सातपुते यांची निवड
महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी मेळावा व विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
नगर : बाजार समिती ही शेतकरी हितासाठी काम करत असून राज्यामध्ये 307 बाजार समिती आहे. यामध्ये सुमारे दहा हजार कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करत आहे, मात्र कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहे. बाजार समितीच्या शिपाईपासून ते सचिवापर्यंत कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाच्या सेवेत सामावून घेण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. याचबरोबर विविध प्रश्न प्रलंबित असून ते टप्प्याटप्प्याने आम्ही सर्वजण मिळून मार्गी लावू असे प्रतिपादन अध्यक्ष सचिन सातपुते यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे यांची नेप्ती उपबाजार समिती येथे राज्यव्यापी कर्मचारी मेळावा व विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी उद्धव देवकर हे होते. यावेळी सर्वांच्या मते नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव सचिन सातपुते यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, यावेळी तुषार गायकवाड, संपतराव शिर्के, धनराज शिंपणे, वामनराव साळुंखे, राजू अत्तार, शिवाजी मगर, अभय भिसे, राजेंद्र लगड, सुरेश आढाव, पेन्शन योजनेचे अध्यक्ष डीडी शिनगारे, संजय काळे, आदींसह महाराष्ट्र राज्यातून बाजार समितीचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव देवकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे संघटनेची राज्यव्यापी कर्मचारी मेळावा व विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली आहे, राज्यभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते, या सभेत नगर बाजार समितीचे सहाय्यक सचिव सचिन सातपुते यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे लवकरच राज्याची कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे असे ते म्हणाले.