Tuesday, May 28, 2024

राजकीय स्टंटबाजी साठी अश्लील भाषेत आया बहिणींवर शिवीगाळ करणाऱ्या बाळासाहेब हराळ यांना आया बहिणी नाहीत का?

नगर – केवळ राजकीय स्टंटबाजी साठी देशाच्या पंतप्रधान पदावर असलेल्या नरेंद्र मोदी यांना तसेच बाजार समितीतील आडते व्यापारी यांना अश्लील भाषेत आया बहिणींवर शिवीगाळ करणाऱ्या बाळासाहेब हराळ यांना आया बहिणी नाहीत का? असा संतप्त सवाल करत या कृत्याचा आपण जाहीर निषेध करत असल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे.

बाळासाहेब हराळ यांनी काही कार्यकर्त्यांसमवेत गुरुवारी (दि.९) नेप्ती कांदा मार्केट मध्ये घातलेला गोंधळ हा केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली राजकीय स्टंटबाजी होती. हराळ यांना थोड्याच दिवसांत त्यांच्या नेत्याचा वाण नाही तर गुण लागला आहे. त्यांच्या नेत्याने आज पर्यंत प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांचे बाप काढण्याचे कर्तुत्व दाखवलेले आहे. त्या जोरावर त्यांना खासदार झाल्यासारखं वाटू लागलंय. तशीच काहीशी आमदारकीची स्वप्ने तर हराळ यांना पडू लागली नाहीत ना? त्यामुळे त्यांची वैचारिक पातळी एवढी खालच्या स्तरावर गेली. असा सवालही भालसिंग यांनी उपस्थित केला आहे.

आम्हीही शेतकरीच आहोत, आमचे महायुतीचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. पण केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी महाआघाडीच्या वतीने शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याची केविलवाणी धडपड सुरु आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही आंदोलन करावे, त्याबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही. त्यांनी या पूर्वीही अनेक वेळा आंदोलने केली. आम्ही काहीच बोललो नाही, पण आंदोलने करताना काहीतरी तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते एका घटनात्मक पदावर आहेत. त्यांच्या मातोश्री तर दिवंगत झालेल्या आहेत. पंतप्रधान मोदींना तसेच बाजार समितीतील आडते व्यापारी यांना अश्लील भाषेत आया बहिणींवर शिवीगाळ करणे हे कोणत्या संस्कृतीत बसते? असा सवाल उपस्थित करत हराळ यांनी केलेले आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर त्यांचे पाकीट वाढवून घेण्यासाठी होते, असा टोलाही जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी लगावला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles