Friday, December 1, 2023

नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी कायम, आ.बाळासाहेब थोरात यांची टीका

नगर शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे – माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

प्रतिनिधी : अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारच, पोलिसांच अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप सुद्धा दिलं नव्हतं. दुर्दैवाने अजूनही नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी आहे. तरी हेरंब कुलकर्णी यांच्या सारख्या एका मुख्याध्यापकांवर हल्ला होतो. यातून नगर शहरात दहशत, दादागिरी, गुंडगिरी आहे हे चित्र त्यामुळे आणखी स्पष्ट झालं आहे. ही अत्यंत निषेधार्य गोष्ट घडलेली आहे. त्यामुळे अजून ही मला प्रशासनाला सांगायच आहे की नगरची गुंडगिरी, दहशत ही थांबली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जिल्हा शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी थोरात म्हणाले, की नगर हे जिल्ह्याचे शहर आहे. राज्यातील ही एक प्रमुख शहर आहे. इथे जे गुंडगिरीचा वातावरण वाढतं आहे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. याचा आग्रह मी विधानसभेत धरला होता. सरकार आणि पोलीस दलाच्या प्रमुखांशी ही बोललो होतो. तरी हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होतो. हे दुर्दैवी आहे.
मी कुलकर्णी यांची भेट घेणार आहे. दृष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध काम करणार त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हे त्यांचे काम सातत्याने राहिलेल आहे.

थोरात पुढे म्हणाले, नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे वडिलांच्या निधनामुळे दुःखात होते. मात्र जेव्हा ते दुखातून बाहेर आले, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी कोणती केली असेल तर शहरातल्या प्रमुख ठिकाणी आणि विद्यालयांच्या ठिकाणी चाललेले अवैध धंदे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. नगर शहरात हे एवढं उघडपणे शैक्षणिक संस्थांच्या जवळ चालतं. विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी चालतं. ही नगरला शोभा देणारी गोष्ट नाही. प्रशासनानं अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मी काळेंचं कौतुक करतो. या निमित्ताने त्यांनी एक धाडसी पाऊल उचललं आहे. नगर सुंदर शहर बनाव, शांतता प्रिय शहर बनाव याकरिता त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, प्रताप शेळके पाटील, संपतराव म्हस्के, मंगल भुजबळ, उत्कर्षा रूपवते, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनील क्षेत्रे, उषाताई भगत राणीताई पंडित, सुनिता भाकरे, जरीना पठाण, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, रोहिदास भालेराव, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, फैयाज शेख, मयूर भिंगारदिवे, किशोर कोतकर, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अरुण मस्के, जयंत वाघ, ॲड. माणिक मोरे, शरद गुंजाळ, सोफियान रंगरेज, गौरव घोरपडे, विश्वनाथ निर्वाण, अजित वाडेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: