Tuesday, February 27, 2024

मनोज जरांगे पाटीलांची टिम नगरमध्ये…मदरशाच्या 85 एकर जागेवर मुक्कामाचे नियोजन

नगर – मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पद यात्रा अहमदनगर येथून जाणार असून यामध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असून त्यांच्या मुक्कामासाठी बाराबाभळी मदरसाची पाहणी जरांगे पाटील याच्या नियोजन कमिटी ने केली. यावेळी मदरसाचे सेक्रेटरी मतीन सय्यद समवेत श्रीराम कुरणकर, राम जरांगे, गोरख दळवी, मिलिंद जपे, भाग्येश सवासे, विलास तळेकर, स्वप्निल दगडे, सुधीर दुसंगे, संदीप जगताप, परमेश्वर पाटील आदी उपस्थित होते.
बाराबाभळी मद्रास्याची 85 एकर जागेची व मदरसाची पाहणी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी येथून २० जानेवारीला पदयात्रेने मुंबईला जाण्यासाठी सुरुवात होणार आहे. या पदयात्रेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असून ही पदयात्रा अंतरवली सराटी ते गेवराई, खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, वाघोली, शिवाजीनगर, पुणे, मुंबई एक्सप्रेस हायवे, लोणावळा, पनवेल, मुंबई अशा मार्गाने जाणार आहे. मराठा मोर्चा नगर शहरात येत असताना बाराबाभळी येथील मदरसा मध्ये मुक्काम असणार असून येथे अन्न, पाणी, लाईट, निवास या सोई सुविधा नियोज कमिटीने पाहणी केली व येथेच मुकामी थांबण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles