अयोध्येत सोमवारी (ता. २२) प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरातील मांसाहरी आणि मद्य दुकाने बंद ठेवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होत असताना नगर जिल्ह्यातील बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे मांसाहरी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय दुकानदारांनी घेतला आहे.
उपसरपंच अभिषेक खंडागळे, सदस्य मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले यांनी सर्व विक्रेत्यांना, तशी विनंती केली. तसा विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला संमती दिली.
बेलापुरमधील () मांस विक्रेत्यांच्या या निर्णयाचे नगर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. ग्रामविकास अधिकारी मेघशाम गायकवाड, बाबुराव पवार, मारुती गायकवाड, फरहान कुरेशी, शाहरुख शेख, मुस्तकिम सय्यद, फिरोज सय्यद, श्रीलाल गुडे उपस्थित होते.