Sunday, July 14, 2024

नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीत २ कोटींचा अपहार… माजी सरपंच, ग्रामसेवकावर ठपका…

नगर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत १ कोटी ९४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशी अहवालात समोर आले आहे. यासंदर्भात यापूर्वीच दोन ग्रामसेवकांवर निलंबन कारवाई झाली आहे. तसेच तत्कालीन सरपंचावरील कारवाईसाठी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

तत्कालीन सरपंच महेंद्र साळवी व ग्रामसेवक राजेश तगरे यांच्या कार्यकाळातील चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख, चंद्रकांत नवले, उज्ज्वला कुताळ यांच्यासह सत्ताधारी सदस्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य़कारी अधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त करून ग्रामपंचायतची १ एप्रिल २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीतील दफ्तराची चौकशी केली. प्रमाणकाशिवाय ग्रामनिधीमधून २६ लाख ९९ हजार ७१४ रुपये काढले, जीईएम पोर्टलद्वारे साहित्य खरेदी न करता ८९ लाख २२ हजार ९११ रुपये खर्च, १५ व्या वित्त आयोगांतर्गत २०२१-२२ व २०२२-२३ मधील एकत्रित काम पाण्याची टाकी बांधकाम करणे (७३ लाख ६३ हजार ४६४ रुपये) या कामाची ई निविदा प्रक्रियेबाबत वापरलेली कागदपत्रे तपासास उपलब्ध करून न दिल्याने ऑनलाईन तपासणी करता आली नाही. विकासकामांवर ७० लाख २७ हजार ३५७ रुपये खर्च, पैकी २३ लाख ३१ हजार ६५८ रुपये या शासकीय रकमेची साहित्य व विकासकामे न करता रक्कम परस्पर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने कायम काढून घेतली.

उर्वरित ४६ लाख ९५ हजार ६९९ रक्कमेच्या कामाची अंदाजपत्रके निविदा व मूल्यांकने, कामाची ठिकाणे तपासणी कामी उपलब्ध न झाल्याने ही रक्कम संशयितांनी अपहार केल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीकडे डिझेल वाहन असताना १ लाख ४३ हजार ८०६ रुपयांचे पेट्रोल खरेदी केले. तसेच ६ लाख ७४ हजार २५ रुपयांचे खरेदी केलेले डिझेल कोणत्या वाहनासाठी वापरले याचे लॉगबुक उपलब्ध नाही. यांसह अनेक मुद्द्यांवर अहवालातून प्रकाश टाकण्यात आला असून तत्कालीन सरपंच साळवी व तत्कालीन ग्रामसेवक तगरे यांच्याकडून एकूण १ कोटी ९४ लाख ६७ हजार ८१३ रुपये कायमस्वरूपी वसूल पात्र असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles