अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर पक्षाचे
लोकसभा निवडणूक समन्वयक प्रा. भानुदास बेरड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रा. बेरड म्हणाले,
हा मतदारसंघ भाजपचा गड होता. हा गड आज जरी पडला असला तरी आम्ही नव्याने पक्ष बांधणी करू. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यातील भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता हा पूर्णपणे बाजूला पडला होता, नाराज होता. शेवटच्या टप्प्यात या सर्वांची नाराजी काढून प्रचारात सक्रिय करण्याचा आम्ही अटोकाट प्रयत्न केला. या पराभवाचे आम्हाला नक्कीच चिंतन करावे लागेल. तसेच निष्ठावंताना देखील बळ द्यावे लागेल. चिंतन करून झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू.