भाजप नगर दक्षिणेचे रविवारी पाथर्डीत अधिवेशन : जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग
बड्या नेत्यांसह पालकमंत्र्यांची उपस्थिती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुचनेनुसार भाजप नगर दक्षिण जिल्हा विस्तारित कार्यकारिणी एक दिवसीय अधिवेशन पाथर्डी येथे रविवार (दि. ४) रोजी माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. भागवत कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह भाजप प्रदेश, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले .
जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले की , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जुलै रोजी पुणे बालेवाडी येथे प्रदेश भाजपाचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनात ठरल्याप्रमाणे नगर उत्तर व शहर जिल्ह्याचे विभागीय अधिवेशन राहुरी येथे झाले. त्याचप्रमाणे नगर दक्षिण जिल्हा अधिवेशन पाथर्डी येथे होणार आहे. अधिवेशनास येणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी यांची सर्व व्यवस्था व अधिवेशनाची जबाबदारी आ . मोनिकाताई राजळे यांनी घेतली आहे .या अधिवेशनास माजी केंद्रीय मंत्री डॉ. कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, आ. मोनिकाताई राजळे , आ. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, डॉ. सुजय विखे पाटील, चंद्रशेखर कदम, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी दक्षिणेतील पारनेर, राहुरी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव व पाथर्डी मंडलाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य, महिला आघाडी, युवा मोर्चा तसेच पक्षाचे आघाडी पदाधिकारी, सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप भालसिंग यांनी केले आहे.