Monday, July 22, 2024

निवडणूकीनंतर शहर भाजपमध्ये धुसफूस… पक्ष निरीक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाढा..

नगर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर उफाळलेल्या गटबाजीचे कवित्व अद्याप थांबायला तयार नाही. आता पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षनिरीक्षकांच्या बैठकीपासून विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे व त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आले. गंधे यांनी याबाबतची तक्रार पक्ष निरीक्षक खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

नगर शहर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे अनेक इच्छुक आहेत, मात्र पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी नगर शहरातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे केली. आगरकर यांची ही मागणी पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना डावलण्यासाठीच असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भिंगार छावणी मंडळाचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी आगरकर यांची शहर जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यामुळे शहर भाजपमध्ये गटबाजी उफाळल्याचे चित्र निर्माण झाले. पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांची पक्षाने नियुक्ती केली. त्यांच्या उपस्थितीत काल, बुधवारी नगरमध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीचे निरोप शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना जाणून-बुजून न देण्यात आल्याची तक्रार विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे व त्यांच्या समर्थकांनी केली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी खासदार कुलकर्णी यांच्याकडे इतर स्वरूपाच्याही तक्रारी केल्या. पक्षाची बैठक आटोपल्यानंतर महेंद्र गंधे यांनी खासदार कुलकर्णी यांना आपल्या संपर्क कार्यालयात स्वतंत्रपणे निमंत्रित करून त्यांचा सत्कार केला. त्यावेळी या तक्रारी करण्यात आल्या. खासदार कुलकर्णी यांचे पुण्यातील संघटनात्मक काम उत्कृष्ट आहे, त्यांनी नगरच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी एक दिवस वेळ द्यावा, अशी मागणीही या पार्श्वभूमीवर गंधे यांनी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles