नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. सर्वसामान्यांसह प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांच्या उन्नत्तीसाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाची भरारी घेतली आहे. त्यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाचे काम मार्गी लागले आहे, शिडी येथील साईबाबा दर्शन रांगाचे उद्घाटन अशा नगरमधील योजना व उपक्रमांचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून, शिर्डी येथे होणार्या कार्यक्रमास नगर शहरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे होत असलेल्या कार्यक्रमाच्या नियोजनार्थ आयोजित बैठकीत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे, सुनिल रामदासी, वसंत लोढा, प्रशांत मुथा, महेश नामदे, रामदास आंधळे, मयुर बोचुघोळ आदि उपस्थित होते.
यावेळी शहर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नगर दौर्याचे नियोजनवर चर्चा करण्यात येऊन पदाधिकार्यांवर विविध जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. यावेळी नगरमधून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाण्याचा निर्धार करण्यात आला.
याप्रसंगी दत्ता गाडळकर, पंडित वाघमारे, किशोर भिंगारे, राजु मंगलाराप, नगरसेविका सोनाली चितळे, प्रदीप परदेशी, रविंद्र बारस्कर, लता शेळके, मालनताई ढोणे, दिपक देहेरेकर, सुहास पाथरकर, साहेबराव विधाते, निलेश सातपुते, आर्यन कोतकर, बाळासाहेब भुजबळ, अॅड.धनंजय जाधव, हर्षल आगळे, महादेव गाडे, विजय घासे, गोपाल वर्मा, संदिप पवार, सुनिल भिंगारे, विशाल कर्डिले, देवेंद्र देशमुख, सुनिल सकट, अनंत देसाई, बी.आर.भिंगारदिवे, प्रविण ढोणे, कुंडलिक गदादे, बंटी ढापसे, नरेश चव्हाण, वैभव झोटिंग, बाळासाहेब गायकवाड, नितीन शेलार, उमेश साठे, धनंजय जामगांवकर, कालिंदी केसकर, सुजाता औटी, सविता कोटा, प्रिया जानवे, संध्या पावसे, रेणुका करंदीकर, सचिन कुसळकर, शशिकांत पालवे, वैभव जोशी, राजेंद्र एकाडे, महेश तवले, अनिरुद्ध घैसास, दिपक आरडे, मयुर वांढेकर, ज्ञानेश्वर धिरडे, बाळासाहेब तागड, सुनिल पांडूळे, डॉ.स्मिता भुसे, अॅड.चंदन बारटक्के, अनिल जोशी, अनिल सबलोक, अनिल ढवण आदि उपस्थित होते.