Thursday, September 19, 2024

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नगर शहरात…विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीत राजकीय चर्चा

नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे निवडणूक व संघटन प्रभारी शिवप्रकाश व विभाग संघटन मंत्री तथा मुख्यालय प्रभारी महाराष्ट्र प्रदेशचे रवी अनासपुरे शहरात आले असता त्यांनी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांच्या नगर-कल्याण रोड येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर सचिव दत्ता गाडळकर, सचिन पारखी, अमोल घोलप, विजय गाडळकर, भगवानराव काटे, बाबासाहेब सानप, अमोल निस्ताने आदी उपस्थित होते.
गाडळकर परिवाराच्या वतीने शिवप्रकाश व अनासपुरे यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रकाश व अनासपुरे यांनी शहर व जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहिती घेतली. तर शहरातील विविध प्रश्‍नांवर चर्चा केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles