Monday, April 22, 2024

प्रदेश कार्यकारिणीवर निवड होताच वसंत लोढांचा निर्धार, नगरचा पुढील आमदार भाजपचाच…

ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड
नगर : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांची भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या संघटनात्मक नेमणुकाअंतर्गत वसंत लोढा यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. वसंत लोढा हे भाजपचे नगरमधील जुनेजाणते नेते आहेत. शहरात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कायम मोठे योगदान दिले आहे. त्यांना प्रदेश संघटनेत स्थान मिळाल्याने त्यांनी केलेल्या पक्षीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक क्षेत्रातील कार्याची पावती मिळाली आहे.

या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना वसंत लोढा म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाचे नगरमध्ये स्थापनेपासून काम करीत आहे. येत्या काळात नगर शहरात भाजपचा आमदार होण्यासाठी सर्वांना सोबत घेवून प्रयत्न करणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत नगरला पुन्हा भाजपचाच खासदार निवडून येईल आणि देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच विराजमान होतील यासाठी जोरात काम चालू आहे. गेल्या दहा वर्षात नगर शहराची बिकट परिस्थिती झाली आहे. ती सुधारण्यासाठी राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील नेत्यांशी संवाद साधून प्रयत्न करणार आहोत. यासाठी नगरकरांशीही संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी नेटाने प्रयत्न चालू आहेत. लोढा यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक पक्ष संघटन, नगरच्या समस्यांबाबत राज्यपातळीवर आवाज उठवणारे अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे अशा भावना नगरमध्ये व्यक्त होत आहे. या नियुक्तीबद्दल लोढा यांचे पक्ष कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles