भाजप पदाधिकारी पाठक यांचा राजीनामा
आ.कर्डीले गटाला धक्का
करंजी – अहमदनगर भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य व सातवड सेवा सोसायटीचे चेअरमन बंडू पाठक यांनी आपल्या जिल्हा कार्यकारणी सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांना पाठवलेल्या पत्रामध्ये पाठक यांनी राजीनामा दिला आहे.पाठक यांच्या या राजीनाम्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून पाठक यांनी तडका फडकी राजीनामा का दिला याबाबत चर्चेला उधान आले आहे.
बंडू पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.ग्रामपंचायती पासून खासदारकी पर्यंत ते निवडणुकीत सक्रिय राहून भाजपाचे तथा पक्षांचे निष्ठेने काम करत आले आहेत. पाठक यांचा राजीनामा हा आ. कर्डीले गटाला धक्का मानला जात आहे.मात्र राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
पक्ष अडचणीत असतानाच पाठक यांनी राजीनामा दिल्याने भाजपासह इतर पक्षांच्याही भुवया उंचावल्या असून पाठक हे आता पक्षापासून दूर जाताना दिसत आहे. पाठक यांच्या राजीनामामुळे शिवाजी कर्डीले गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आगामी काळात ते भाजपचं काम करतात की नाही याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. काही दिवसापूर्वी खासदार निलेश लंके यांनीही पाठक यांची घरी जाऊन भेट घेतली होती त्यामुळे भविष्यात पाठक राष्ट्रवादीचे काम करणार का? असे अनेक तर्क पाठक यांचे बाबत लावले जात आहेत. एक मात्र निश्चित झाले की पाठक यांच्या राजीनामामुळे भाजप अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा उघड झाले असून पाठक यांच्या मार्गावर राजीनामा देत आणखी काही युवा कार्यकर्ते राजीनामा देऊन पक्षाच्या बाहेर पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
पाठक यांनी राजीनामा दिल्यामुळे या भागातून निश्चितच भाजपची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.मात्र माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे बंडू पाठक यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतील का ? की नाराज असलेले पाठक यांना आपल्याकडे खेचण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होते हे आता पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.
पक्षातील एकाधिकारशाही तसेच निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच डावलले जाणे बाहेरून पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात महत्त्वाची पद दिली जातात. अशा अनेक कारणांमुळे भाजपा पक्षांमध्ये अंतर्गत असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे . पाठकच्या रूपाने इतरही पदाधिकारी पक्षाचे राजीनामे देऊन बाहेर पडणार असून भाजपला मोठा धक्का देणार असल्याचे पाठक यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.