नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप उपमुख्यमंत्री
अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजप-सेना-राष्ट्रवादीकडून ही जागा आ. जगताप यांनाच सोडण्याची वेळ आली तर… या शक्यतेने शहर भाजपमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघ प्रमुख भैय्या गंधे यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचं आवाहन केले आहे.
गंधे म्हणाले, राज्यात ज्या राजकीय घडामोडी होत आहेत, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीने दूरदृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित होवू नये. खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे चालूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी नगरचा लोकप्रतिनिधी हा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचाच होईल, अशी ग्वाही मी ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात देतो, असेही ते म्हणाले.