अहमदनगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी हर घर सावरकर हे अभियान राज्यात राबवले जात आहे. या अंतर्गत हिंदु तेज सूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचे प्रयोग पूर्ण राज्यात होत आहेत. नगर शहरात शिवसेना भाजप युतीच्या वतीने शुक्रवार दि.१४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव सहकार सभागृह येथे या नाटकाच्या मोफत प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी दिली
‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकाचा प्रयोग सर्व नागरिकांसाठी मोफत आहे. सर्व नागरिकांनी या नाट्य प्रयोगास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंदे, भिंगार शहर प्रमुख सुनील लाल बोंद्रे, सुवेंद्र गांधी, सचिन पारखी, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले आदींनी केले आहे.
नगर शहरात शिवसेना भाजपच्या वतीने “सागरा प्राण तळमळला” नाटकाचे मोफत आयोजन…
- Advertisement -