दिवाळी हंगामानिमित्त एस. टी. बस च्या प्रवासी भाड्यात
8 नोव्हेंबरपासून बदल
अहमदनगर दि. 06 ऑक्टोबर – दिवाळी हंगाम 2023 मध्ये 7 नोव्हेंबर, 2023 च्या मध्यरात्रीपासुन म्हणजेच 8 नोव्हेंबर, 2023 पासून एस. टी. बसेसच्या भाड्यात बदल करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. एस.टी ची ही भाडेवाड 27 नोव्हेंबर, 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
एस. टी. महामंडळाच्या ग्रामीण भागातील साधी व जलद बस 9.60 रुपये प्रति टप्पा, निमआराम से साधी शयन आसनी बस 13.05 रुपये प्रति टप्पा, वातानुकूलित जनशिवनेरी (आसनी) 14.25 रुपये प्रतिटप्पा आणि वातानुकूलित शिवनेरी (आसनी) 18.50 रुपये प्रतिटमा भाडे आकारण्यात येणार आहे.
प्रवाशांनी अवैध प्रवाशी वाहनामधून प्रवास करु नये. एस. टी. बसेसमधूनच प्रवास करून एस. टी. महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.