अनैतिक संबंधाचा संशय घेवुन जाब विचारल्याने पत्नीचा खुन करुन, प्रेत पुरुन विल्हेवाट लावणारा फरार पती स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. रोहित संतोष मडके वय 26, रा. फर्काबाद, ता. जामखेड यांची बहिण मयत नामे रुपाली ज्ञानदेव आमटे वय 24, रा. पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा हिने पती ज्ञानदेव पोपट आमटे याचे अनैतिक प्रेम संबंधाबाबत जाब विचारल्याचा राग येवुन पती ज्ञानदेव आमटे याने कशानेतरी मारहाण करुन, जिवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मयताचे प्रेत कापडात बांधुन घराचे डाव्या बाजुस खड्डा करुन पुरले व पत्नी रुपाली हरवल्याची खोटी तक्रार दिली वगैरे तक्रारी वरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 929/2023 भादविक 302, 201 प्रमाणे दिनांक 18/11/2023 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना पथक नेमुण गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बबन मखरे, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुण यातील आरोपीचा शोध घेवुन ताब्यात घेणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथक गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाल्याने पथक त्याचे शोधार्थ दिनांक 18/11/23 रोजी पासुन गुजरात राज्यात गेले. सदर आरोपी हा वेळोवेळी वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याचा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुजरात राज्यातील विविध ठिकाणचे हॉटेल, लॉजेस व टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) ज्ञानदेव ऊर्फ माऊली पोपट आमटे वय 33, रा. पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने, तो कंत्राटी व्यवसाया निमित्त वेळोवेळी बाहेरगांवी जात असल्याचे कारणावरुन पत्नी रुपाली ही त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेवुन वारंवार वाद घालत असे दि.10/11/23 रोजी रुपाली ही सदर कारणावरुन वाद घालु लागल्याने, त्याने रागाचे भरात तिचे नाक – तोंड तसेच गळा आवळुन खुन करुन, प्रेत घराचे जवळ खड्डयात पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने पुरले व ती हरवली असल्याची खोटी तक्रार पोलीस स्टेशनला दिल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.