Monday, December 4, 2023

नगरमधील मुस्लिम कुटुंबातील १० जणांनी स्वीकारला हिंदू धर्म ,हिंदूत्ववादी संघटनेची त्या कुटुंबासोबत दिवाळी भाऊबीज

घरवापासी केलेल्या शिवराम आर्य कुटुंबा सोबत नितीन उदमले फॉउंडेशनची दिवाळी व भाऊबीज साजरी.

मागील आठवडयात छत्रपती संभाजीनगर येथे श्री.जमील शेख यांनी कुटुंबासह श्री बागेश्वर धाम यांचे उपास्थितीत हिंदू धर्मात घरवापसी करून शिवराम आर्य नाव धारण केले. या आर्य कुटुंबा सोबत नितीन उदमले फॉउंडेशन ने दिवाळी व भाऊबीज साजरी केली. या वेळी प्रा. भानुदास बेरड सर, नितीन उदमले, रमेश पिंपळे,हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडॊळे, ऍड काकडे,विश्वहिंदू परिषदेचे प्रा. गौतम कराळे,सचिन लोखंडे,भाजपा चे पंडित वाघमारे सर, हर्षल आगळे,राज शेलार, प्रशांत देठे उपस्थित होते.
या वेळी हिंदू धर्मातील रीती रिवाजा नुसार श्री.शिवराम व त्यांच्या पत्नी सौ.सीताबाई यांचा टॉवेल टोपी व कपडे देऊन मानसन्मान करण्यात आला. मुलांना मिठाई व फटाक्यांचे वाटप करण्यात आले. मुलांसोबत फटाके फोडून व कुटुंबासोबत फराळ करून आनंद साजरा करण्यात आला.
सौ. सीताबाई यांनी भाऊबीजे निम्मित सर्व बंधूचे औषण करून करदोडा दिला.
हिंदू धर्मा मध्ये घरवापसी केल्या नंतर प्रथमच दिवळी साजरी करत असताना अश्या प्रकारे अचानक सर्वांनी घरी येऊन दिवाळी साजरी केल्याने आर्य कुटुंबाचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. प्रा. बेरड सर यांनी कुटुंबियांना जगातील सर्वात सहिष्णू धर्म असणाऱ्या हिंदू धर्मात सर्वांचे स्वागत केले व सर्वांना दिपावली च्या शुभेच्छा दिल्या. नितीन उदमले यांनी शिवराम आर्य यांचे कौतुक करून त्यांना सर्व प्रकारे सोबत करण्याचे आश्वासन दिले व पाठिंबा व्यक्त केला. तसेच मुलांचे शिक्षण ई साठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: