Saturday, December 7, 2024

Ahmednagar breaking… कॉंग्रेसच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला…थोरातांनी केली कारवाईची मागणी

काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमानंतर परतत असताना काँग्रेसच्या शहराध्यक्षावर हा हल्ला झाला आहे. दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लोणी गावात हा हल्ला झाला आहे.

काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे मंगळवारी सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत होते. त्यावेळी दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर आणली आणि त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. राहता तालुक्यातील लोणी गावात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सचिन चौगुले आणि त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. यावेळी इस्पितळाबाहेर मोठी गर्दी जमली होती. आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखे पाटलांवर निशाणा साधत टीका केली होती

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles