नगर (प्रतिनिधी): तोफखाना पोलीस ठाण्यात नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक उपाधीक्षक कार्यालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यात मंडल अधिकारी शैलजा देवकाते आणि तलाठी सागर भापकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
या संदर्भात तक्रारदार मार्फत ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 निरंजन नाईकवाडी यांच्या कोर्टात दाखल असलेल्या देवकाते आणि भापकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला आव्हान दिले आणि न्यायालयाने या दोघा लोक सेवकांचा सकाळी दाखल केलेला जामीन अर्ज सायंकाळच्या सत्रात फेटाळला.
तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 835/ 2024 अधिनियम सन 1988 चे कलम सात या गुन्ह्यामध्ये भ्र.प्र.अधिनियम सन 1988 चे कलम 12 हे समाविष्ट करून लोकसेवक तलाठी सागर भापकर आणि सावेडीच्या मंडल अधिकारी श्रीमती शैलजा रामभाऊ देवकाते त्यांच्याविरुद्ध दाखल होता.
त्यांना लाच खोरीच्या प्रकरणात पकडण्यासाठी नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा लावला होता.
तक्रारदाराच्या फ्लॅटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44 हजार रुपये लाच स्वीकारल्याचे त्यांनी पंचांसमोर मान्य केले होते आणि पाचशे रुपये प्रमाणे 22 फ्लॅटचे अकरा हजार रुपये द्या असे सांगून तक्रारदार यांना लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले होते. लाच लुचपत विभागाने त्यानुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे दोघे फरार झाले.
त्यानंतर या दोघांनी नगरच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. तो आता न्यायालयाने अखेर फेटाळला आहे.
Ahmednagar लाच प्रकरणी महिला मंडलाधिकारी व तलाठी यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर…
- Advertisement -